ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या काळात बदलते हवामान आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरावर वाईट परिणाम होतात.
आजकाल मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मधुमेहाच्या रुग्णांनी आहारा पौष्टिक पदार्थांचा समावेश करायला हवा.
आवळ्यात क्रोमियम असते. ज्यामुळे पचनसंस्था सुरळीत काम करते. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
कडुलिंब रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करते. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण कडुलिंबाची पाने उकळवून ते पाणी पिऊ शकतात.
जांभूळ हे मधुमेहींसाठी फायदेशीर असते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जांभूळ प्रभावी आहे.
दालचिनी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. म्हणून मधूमेह असणाऱ्या लोकांनी दालचिनी खावी.
कारल्यात इन्सुलिनसारखे गुणधर्म असतात. जे पेशींमध्ये ग्लुकोज तयार करण्यास मदत करतात.