ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक महिलेला सर्वोत्तम आई व्हायला आवडते. परंतु आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम आई बनणे इतके सोपे नाही. यासाठी कोणतीही काम काळजीपूर्वक करावे लागते.
आपल्या मुलांना समजून घेण्यासाठी, आपण प्रथम आपल्या स्वतःच्या कमतरता आणि सामर्थ्य ओळखणे महत्वाचे आहे.
वयानुसार मुलींना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आईने आपल्या मुलीला समजून घेऊन तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
मुला मुलींचे वय कितीही असो, आईने तिची प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी. सदैव तिच्या पाठीशी उभे राहावे अशी मुलांची इच्छा असते. असं केल्याने तुम्ही तुमच्या मुलांसाठी सर्वोत्तम आई बनाल.
जर तुमची मुले तुमच्याकडे येऊन त्यांच्या भावना व्यक्त करत असतील तर तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका. त्यांच्या भावना समजून त्यांच्या समस्या सोडवा.
जर तुम्हाला तुमच्या मुलांशी तुमचे नाते घट्ट करायचे असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या चुकीबद्दल सॉरी म्हणा.
आईने आपल्या मुलीला तिच्या करिअरमध्ये पूर्ण साथ दिली पाहिजे. आईच्या पाठिंब्याने मुले स्वतःवर विश्वास ठेवू लागतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.