Shraddha Thik
नागपूर हे एक असे ठिकाण आहे जे प्रवासाच्या दृष्टीने तितके प्रसिद्ध नसेल, पण हे ठिकाण त्याच्या खास चवीसाठी नक्कीच ओळखले जाते.
नागपुरी संत्री देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. अशाप्रकारे संत्री खाण्याव्यतिरिक्त इतरही अनेक पदार्थ यापासून बनवले जातात, त्यापैकी एक म्हणजे संत्रा बर्फी.
नागपूर हे शहर नुसते संत्र्यांसाठीच नाही तर जिलेबीसाठीही फेमस आहे. येथे ठिकठिकाणी गरमागरम जिलेबीवर रबडी टाकून दिले जाते.
पाणीपुरीला जितकी नावं आहेत तितकीच ती खाण्याच्या आणि सर्व्ह करण्याच्या पद्धती आहेत. नागपुरात दही पुरी खाल्ल्यानंतर तुम्हीही वेडे व्हाल.
पाटवडी हे जरी महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि हे नागपुरात खूपच आवडीने खाल्ले जातात.
यामध्ये बेसनाच्या पिठापासून बनवलेल्या मसालेदार करीसोबत बेसनाचे पकोडे हे रस्यासोबत सर्व्ह केले जातात.
मसालेदार पोहे ही नागपूरची डीश म्हणून ओळखले जाते. नागपुरात ते स्वादिष्ट, गरम काळ्या हरभऱ्याच्या भाजीसोबत दिले जाते.