सततच्या दातदुखीमागे लपलेले असू शकतात 'हे' आजार

Surabhi Jayashree Jagdish

खाण्या-पिण्याच्या वेळी वेदना

अनेक वेळा सेंसिटिव इनॅमल झिजल्यामुळे दात थंड किंवा गरम पदार्थांमुळे दुखू लागतात. इनॅमलच्या झिजीमुळे दात अधिक संवेदनशील होतात. यामुळे खाण्या-पिण्याच्या वेळी वेदना जाणवू शकतात.

आजार

तुम्हाला माहिती आहे का की, दात दुखत असल्यास कोणता आजार असू शकतो? दातदुखी ही केवळ तात्पुरती समस्या नसून ती गंभीर कारणांचे संकेत असू शकते. त्यामुळे योग्य तपासणी आवश्यक आहे.

दात सडणं

दातदुखीचं एक महत्त्वाचे कारण असू शकतं. सडलेल्या दातांमध्ये जंतू वाढतात आणि त्यामुळे वेदना होतात. यामुळे दात कमजोर होऊन इतर दातांवरही परिणाम होतो.

हिरड्या खराब होणं

हिरड्या खराब होणं किंवा संक्रमण होणं हे दातांच्या आजूबाजूच्या हाडांवर परिणाम करू शकते. अशा स्थितीत दात हलू लागतात आणि वेदना वाढतात.

अक्कल दाढ

अक्कल दाढ बाहेर येत असताना देखील दातांमध्ये वेदना होऊ शकते. ही वेदना सामान्य असली तरी ती तीव्र असू शकते. काही वेळा सूज आणि ताण यामुळे ही समस्या अधिक वाढते.

सायनस

काही वेळा सायनसच्या समस्येमुळे वरच्या दातांमध्ये वेदना जाणवू शकते. सायनसचा दाब दातांवर परिणाम करतो. त्यामुळे दातदुखीचा मूळ कारण सायनस असू शकतो.

ओरल कॅन्सर

ओरल कॅन्सर देखील दातदुखीचे कारण असू शकते. ही वेदना सुरुवातीला सामान्य वाटू शकते पण ती हळूहळू तीव्र होते. त्यामुळे सतत दातदुखी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा