Kidney Health: तुमच्या 'या' रोजच्या सवयी किडनीला पाडतायत आजारी; आजच सुधारा

Surabhi Jayashree Jagdish

किडनी

किडनी आपल्या आरोग्यासाठी अनेक महत्त्वाची कामं करते. ही शरीरातील रक्त शुद्ध करते आणि त्यातील अपायकारक घटक व विषारी द्रव्ये बाहेर काढते.

नॅशनल किडनी फाउंडेशन

अमेरिकेतील नॅशनल किडनी फाउंडेशन (NKF) ही संस्था किडनीच्या आजाराबाबत जागरूकता, प्रतिबंध आणि उपचार यावर काम करते.

अहवाल

NKF च्या अहवालानुसार, किडनी दररोज सुमारे 200 लिटर रक्त फिल्टर 24 तास कार्यरत असते.

अन्नपदार्थ

किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी काही अन्नपदार्थांपासून जास्तीत जास्त दूर राहणं आवश्यक आहे.

चुकीचा आहार

अशा चुकीच्या आहाराच्या सवयींबद्दल सांगत आहोत ज्या तुमच्या किडनीचं नुकसान करू शकतात.

मीठ

जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. ज्यामुळे रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत किडनीवर अधिक ताण येतो.

साखर

जास्त साखरेच्या सेवनामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे किडनीतील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचू शकतं.

मैदा

तिसरा पांढरा अन्नपदार्थ म्हणजे मैदा. मैदा थेट किडनीला हानी पोहोचवत नाही परंतु प्रोसेस्ड फूडच्या स्वरूपात त्याचा अतिरेक किडनीसाठी अपायकारक ठरू शकतो.

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा