Blood cancer: ब्लड कॅन्सर झाला की शरीरात होऊ लागतात हे बदल

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड कॅन्सर

ब्लड कॅन्सर हा रक्तातील पेशींमध्ये होणारा कॅन्सर आहे. यात शरीराला नवीन आणि निरोगी रक्तपेशी तयार करण्यात अडचण येते.

ब्लड कॅन्सर होण्याची कारणं

ब्लड कॅन्सरचं कारण पूर्णपणे स्पष्ट नाही. पण जनुकीय बदल, कमजोर रोगप्रतिकारक शक्ती, रेडिएशनचा संपर्क आणि काही रसायनांच्या संपर्कामुळे याचा धोका वाढतो.

वारंवार थकवा

ब्लड कॅन्सरमध्ये निरोगी रक्तपेशी कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे शरीर लवकर थकते आणि अगदी हलके काम करतानाही कमजोरी जाणवते. हा थकवा सतत जाणवणारा असतो.

ताप किंवा संसर्ग

रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्यामुळे शरीराची इम्युनिटी कमी होते. त्यामुळे व्यक्तीला वारंवार संसर्ग होतो आणि ताप येतो. ही समस्या ब्लड कॅन्सरमध्ये सामान्यपणे दिसते.

सहज रक्तस्त्राव होणं

प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे अगदी किरकोळ जखमेवरही जास्त रक्तस्त्राव होतो. शरीरावर निळे किंवा जांभळे डाग सहजपणे दिसतात. ही लक्षणे ब्लड कॅन्सरची महत्त्वाची चिन्हे मानली जातात.

हाडे किंवा सांध्यांमध्ये वेदना

बोन मॅरोमध्ये कॅन्सर पेशी जमा होऊ लागतात. त्यामुळे हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना जाणवतात. हा त्रास सतत किंवा अधूनमधून होऊ शकतो.

Bhakri Tips: ज्वारीची भाकरी थंड झाल्यावर कडक होतेय? 'या' सोप्या टीप्सने भाकरी होईल अगदी कापसासारखी लुसलुशीत

Bhakri Tips | saam tv
येथे क्लिक करा