सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

Surabhi Jayashree Jagdish

किडनी

किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्त फिल्टर करून त्यातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचे काम करतो.

खराब जीवनशैली

खराब जीवनशैलीमुळे किडनी निकामी होण्याचे अनेक प्रकरणं समोर येत आहेत. किडनी खराब झाल्यावर शरीरावर काही लक्षणं विशेषतः सकाळच्या वेळेस दिसून येतात.

मॉर्निंग सिकनेस

किडनी खराब होण्याचं एक लक्षण म्हणजे सकाळी थकवा जाणवणं. झोप पूर्ण झाली तरीही थकल्यासारखं वाटत असेल, तर ते दुर्लक्षित करू नये.

पाय आणि टाचांमध्ये सूज

किडनी शरीरातील सोडियम आणि फ्लुइड बाहेर काढू शकत नाही, त्यामुळे पाय व टाचांमध्ये सूज येते. हे लक्षण कधीही हलकं समजू नका.

चिडचिडेपणा आणि डोकेदुखी

किडनी खराब झाल्यावर मेंदूपर्यंत रक्त नीट पोहोचत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर चिडचिडेपणा, अस्वस्थता आणि डोकेदुखी होऊ शकते.

लघवीत फेस येणं

जर वारंवार सकाळी पहिल्या लघवीत फेस येत असेल, तर हे प्रोटीन लीकेजचं लक्षण असू शकतं. याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे.

चेहरा सूजणं

सकाळी उठल्यावर चेहरा सुजलेला दिसत असेल, तर हे किडनी बिघडल्याचं संकेत असू शकतं. हे शरीरात जास्त फ्लुइड जमा झाल्यामुळे होतं.

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

येथे क्लिक करा