Surabhi Jayashree Jagdish
गर्भाशयाचा कॅन्सर हा महिलांमध्ये वेगाने वाढणारा आजार आहे, ज्याची सुरुवातीची लक्षणे सामान्य समस्यांसारखी असू शकतात.
गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं जर तुम्ही प्रयत्न न करता वजन कमी करत असाल किंवा खाल्ल्यानंतर तुमचे पोट लवकर भरल्यासारखं वाटत असेल हे लक्षण असू शकते.
बद्धकोष्ठता, अतिसार किंवा गॅसच्या समस्या, जर कायम राहिल्या तर ते गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
ओटीपोटाच्या भागात वारंवार फुगणं हे गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकतं.
तुम्हाला वारंवार लघवी करण्याची गरज वाटत असेल किंवा पाठीच्या खालच्या भागात सतत वेदना होत असतील तर ते सामान्य नाही.
जर तुम्हाला खूप लवकर थकवा जाणवू लागला त्याचप्रमाणे अशक्तपणा जाणवू लागला, तर ते शरीरात काही गंभीर बदलाचे लक्षण आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करणं खूप महत्वाचं आहे.