Surabhi Jayashree Jagdish
किडनीमध्ये सूज आल्यास लघवी योग्यपद्धतीने बाहेर पडत नाही आणि शरीरात साचू लागते.
वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे हे किडनीमध्ये सूज येण्याचे लक्षण असू शकते.
लघवीचा रंग आणि वास बदलणे, लघवीमध्ये फेस येणं हीदेखील या स्थितीची लक्षणे आहेत.
स्थिती गंभीर झाल्यास लघवीतून रक्त जाणे हेही किडनीतील सूजेचे महत्त्वाचे लक्षण ठरते.
किडनी योग्य प्रकारे कार्य करत नसल्यास शरीरात इलेक्ट्रोलाइट्स साचू लागतात, ज्यामुळे मळमळ होणे आणि उलट्या होऊ शकतात.
कमरेच्या भागात वेदना जाणवणे, झोपेतून उठल्यावर पाठीत दुखणे ही लक्षणेही किडनीमध्ये सूज असल्याचे संकेत देऊ शकतात.
पाय सुजणे हे देखील किडनी योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे लक्षण असू शकते.
वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.