Surabhi Jayashree Jagdish
प्रोटीन आपल्या शरीरातील एक अत्यंत आवश्यक पोषक घटक आहे. हे शरीरातील पेशी निर्माण करण्यास आणि त्यांची दुरुस्ती करण्यास मदत करते.
स्नायू, त्वचा, केस, नखं, एन्झाइम्स आणि हार्मोन्स तयार करण्यात देखील प्रोटीनची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
शरीरात प्रोटीनची कमतरता तेव्हा दिसून येते जेव्हा आपण पुरेशा प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार घेत नाही किंवा शरीर त्याचे योग्यरीत्या शोषण करू शकत नाही. याची लक्षणं जाणून घेऊया.
प्रोटीन स्नायूंकरिता सर्वात महत्त्वाचे असते. शरीरात याची कमतरता झाल्यास स्नायू आकसतात आणि ताकद कमी होऊ लागते. व्यक्तीला जास्त थकवा जाणवतो आणि जड काम करताना त्रास होतो.
केसांच्या मुळांना बळकट ठेवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतं. प्रोटीनची कमतरता झाल्यास केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. यासोबतच त्यांचा रंगही फिका पडतो.
त्वचा निस्तेज, कोरडी आणि खरखरीत दिसू लागते. नखं सहज तुटतात, पातळ होतात किंवा त्यावर पांढरे डाग उमटतात. हे सर्व संकेत शरीराला पुरेसे प्रोटीन न मिळण्याचे असतात.