Brain Tumor: ब्रेनमध्ये ट्यूमर निर्माण झाल्यास शरीरात दिसतात हे बदल

Surabhi Jayashree Jagdish

डोकेदुखी वारंवार आणि तीव्र होणं

सकाळी उठल्यावर डोकेदुखी जास्त जाणवते. काळानुसार वेदना वाढत जाते आणि सामान्य औषधांनीही आराम मिळत नाही. ही वेदना दाब वाढल्याने होते.

दृष्टी धूसर दिसणं

डोळ्यांवर ताण जाणवणं, वस्तू नीट न दिसणं ही सामान्य लक्षणं आहेत. अचानक दृष्टी गायब होण्याचे क्षणिक प्रसंग येऊ शकतात. ट्यूमर दृष्टीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागावर परिणाम करतो.

संतुलन बिघडणं

चालताना तोल जाणं किंवा चक्कर येणं वाढत जातं. शिडी उतरतानाही असुरक्षित वाटू शकतं. मेंदूतील समतोल राखणाऱ्या भागावर दाब निर्माण झाल्याने हे घडतं.

हात-पाय सुन्न होणं

शरीराच्या एका बाजूला जास्त परिणाम दिसून हात पाय सुन्न होऊ शकतात. वस्तू पकडण्यात किंवा चालण्यात अडचण जाणवू शकते.

स्मरणशक्ती कमी होणं

मूड अचानक बदलणं, चिडचिड वाढणं किंवा एकाग्रता कमी होणं दिसतं. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं किंवा निर्णय घेण्यात अडचण येते. मेंदूतील फ्रंटल लोबवर परिणाम झाल्यास हे बदल जास्त जाणवतात.

Seizures येणं

अचानक हात-पाय थरथरणं, नियंत्रण सुटणं हे लक्षण दिसून येऊ शकतं. कधी कधी काही सेकंद शुद्ध हरपल्यासारखी अवस्थाही निर्माण होते.

बोलण्यात किंवा ऐकण्यात अडचण

शब्द नीट उच्चारता न येणं किंवा वाक्य नीट बोलता येत नाही. ब्रेन ट्यूमरमध्ये इतरांचं बोलणंही समजायला वेळ लागतो.

मळमळ, उलट्या आणि भूक कमी होणं

मेंदूतील दाब वाढल्याने पोटात मळमळ जाणवते. विशेषतः सकाळी जास्त त्रास होऊ शकतो. हा दीर्घकाळ चालल्यास वजनही घटू शकते.

Skin care: थंडीमध्ये हात काळे होतायत? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

येथे क्लिक करा