प्रेग्नेंसीमध्ये गर्भाशयाचं मुख उघडल्यास मिळतात हे संकेत

Surabhi Jayashree Jagdish

गर्भाशय

युट्रसला गर्भाशय असंही म्हटलं जातं. हा स्त्री प्रजननाचा अवयव आहे. गर्भाशयातच भ्रूण विकसित होतो आणि जन्म होईपर्यंत शिशु तिथेच राहतो.

गर्भधारणा

गर्भधारणा, मासिक पाळी आणि प्रसूतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रसूतीदरम्यान गर्भाशय आकुंचन पावतो. त्यामुळे शिशु योनीमार्गातून बाहेर येण्यास मदत होते.

गर्भाशयाचं मुख

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, प्रसूतीचा योग्य वेळ येण्यापूर्वीच गर्भाशयाचा मुख उघडतं. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. लेबर पेन होणं हे गर्भाशयाचा मुख उघडण्याचे संकेत असू शकते.

दोन घटक

युट्रसचे दोन घटक असतात. एक म्हणजे मुख्य गर्भाशय ज्यात बाळ राहते आणि दुसरे म्हणजे गर्भाशयाचे मुख ज्याला सर्विक्स म्हणतात. गर्भधारणेदरम्यान हे दोन्ही घटक एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात.

गर्भाशयाची वाढ

जेव्हा बाळाची वाढ होत असते तेव्हा मुख्य गर्भाशयही त्याच्यासोबत वाढतं. मात्र या वाढत्या बाळाला आणि गर्भाशयाला आधार देण्यासाठी त्याचं मुख बंद राहतं.

गर्भाशयाचं कार्य

जेव्हा प्रसूती होणार असते तेव्हा हे दोन्ही घटक विरुद्ध कार्य करतात. त्या वेळी गर्भाशयाचे मुख उघडू लागतं. आणि मुख्य गर्भाशय बाळाला खाली ढकलू लागते.

लेबर पेन

यालाच लेबर पेन म्हणतात. जर तुम्हाला असं काही जाणवलं तर त्वरित रुग्णालयात जा. कारण हा प्रसूतीचा महत्त्वाचा टप्पा असतो.

Kandivali Tourism: थंडीच्या दिवसात फिरण्याचा प्लान करताय? दूर नकोच, कांदिवलीतील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा