Surabhi Jayashree Jagdish
आवळा म्हणजे व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक पोषक तत्वांचा खजिना. सलग 15 दिवस आवळ्याचा ज्यूस प्यायला सुरुवात केली की शरीरातील अंतर्गत शुद्धीकरणाला वेग मिळतो, पचन सुधारतं आणि त्वचेला नैसर्गिक चमक येऊ लागते.
आवळ्याच्या ज्युसमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊन हिवाळ्यात येणाऱ्या लहान सहान त्रासांपासून संरक्षण मिळतं. हा ज्युस प्यायल्याने शरीरात काय बदल होतात ते पाहूयात.
आवळ्याच्या ज्यूसमधील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स पचनसंस्था स्वच्छ ठेवतात. गॅस, अॅसिडिटी कमी होऊ लागते. मलावरोधाची समस्या हळूहळू कमी होत जाते.
व्हिटॅमिन C त्वचेतील कोलाजेन वाढवतं. त्यामुळे त्वचा तजेलदार, मऊ आणि उजळ दिसू लागते. डाग, पिग्मेंटेशन आणि रफनेस कमी होताना जाणवतो.
आवळ्यातील शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स शरीराला इन्फेक्शनपासून संरक्षण देतात. हिवाळ्यात होणारी सर्दी-खोकला कमी प्रमाणात जाणवतो. शरीराची एकूण प्रतिकारशक्ती वाढते.
आवळा नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतो. लिव्हरमधील घातक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. परिणामी शरीरातील थकवा कमी होतो आणि ऊर्जा वाढते.
आवळ्यातील नैसर्गिक गुणधर्म रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. डायबेटीस असलेल्या लोकांना यातून फायदा होऊ शकतो.