Surabhi Jayashree Jagdish
ओट्समध्ये असलेले फायबर, स्लो कार्ब्स आणि वनस्पतीजन्य पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. ओट्स हे आपल्याला चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करतात. त्यामुळे ओट्सला सुपरफूड मानले जाते.
तुम्ही ३० दिवस दररोज ओट्स खाल्ले तर शरीरात कोणते बदल दिसू शकतात. ओट्समध्ये सॉल्युबल फायबर असते जे पचनक्रिया मंदावते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
जर तुम्हाला पोट फुगणं किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ओट्स उपयुक्त ठरू शकतात. यात असलेले फायबर गट हेल्थ आणि पचनसंस्था सुधारते. त्यामुळे पोट हलकं राहतं आणि गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या कमी होते.
गोड चवीच्या नाश्त्याच्या तुलनेत ओट्स हळूहळू पचतात. त्यामुळे शरीरात ऊर्जा बराच वेळ टिकून राहते. यामुळे तुम्ही दिवसभर एक्टिव्ह राहता.
ओट्समध्ये असलेले बीटा-ग्लूकन वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तसंच हृदय निरोगी ठेवण्यास सहाय्य करते.
अनेक अभ्यासांमध्ये आढळलंय की, जे लोक दररोज ओट्स खातात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो.
अशा प्रकारे सलग ३० दिवस ओट्स खाल्ल्याने तुम्हाला शरीरात अनेक सकारात्मक बदल जाणवतील. मात्र लक्षात ठेवा, ओट्सचे प्रमाण जास्त नसावे.