Manasvi Choudhary
कोबी खायला अनेकजण नाक मुरडतात. लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणालाच कोबी खायला आवडत नाही.
कोबी खायला आवडत नसली तरी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
कोबीमध्ये फायबर, खनिजे आणि जीवनसतत्वे मोठ्या प्रमाणात असतात.
रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी आहारात कोबी खाणे फायदेशीर असते.
कोबी खाल्ल्याने पोटातील दाह कमी होण्यास मदत होते.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते.
कोबीमध्ये व्हिटॅमिन के असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.