Surabhi Jayashree Jagdish
मच्छर अगरबत्ती जळताना सूक्ष्म धूरकण (PM2.5) आणि काही रसायने हवेत पसरतात. बंद खोलीत दीर्घकाळ हा धूर श्वासावाटे शरीरात गेल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. काही संशोधनांमध्ये अशा धुराचा दीर्घकालीन संपर्क कॅन्सरसह इतर आजारांच्या वाढलेल्या धोक्याशी जोडला गेला आहे.
काही रूम फ्रेशनरमध्ये Volatile Organic Compounds (VOCs) आणि इतर रसायने असतात. या रसायनांचा वारंवार आणि दीर्घकाळ संपर्क काही अभ्यासांमध्ये कॅन्सरच्या संभाव्य धोक्याशी जोडला गेला आहे.
खराब झालेलं नॉन-स्टिक भांडं वापरणं टाळावं. रिकामं भांडं खूप जास्त तापवल्यास काही हानिकारक वायू बाहेर पडू शकतात, ज्यांचा दीर्घकालीन संपर्क आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
अन्न गरम करण्यासाठी अयोग्य प्लास्टिक वापरल्यास काही रसायनं अन्नात मिसळू शकतात. काही रसायनांचा दीर्घकाळ संपर्क कॅन्सरसह इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकतो.
टॅल्कम पावडरचे सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात जाऊ शकतात. काही विशिष्ट प्रकारच्या टॅल्कबाबत आणि काही परिस्थितींमध्ये कॅन्सरचा संभाव्य संबंध अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आलाय.
काही हेअर डायमध्ये ॲलर्जी निर्माण करणारी तसंच संभाव्य हानिकारक रसायनं असू शकतात. अनेक वर्षे वारंवार वापर करणाऱ्या काही गटांमध्ये कॅन्सरच्या धोक्यावर संशोधन झालं होतं. मात्र त्याबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत.
काही सुगंधी मेणबत्त्या जळताना धूर आणि रसायनं हवेत सोडतात. बंद जागेत त्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि काही रसायनांबाबत कॅन्सरचा संभाव्य धोका व्यक्त करण्यात आला आहे.
सिगारेट विझल्यानंतरही तिच्यातील हानिकारक रसायनं भिंती, कपडे आणि फर्निचरवर चिकटून राहतात. या रसायनांचा संपर्क, विशेषतः लहान मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढवू शकतो.
या वस्तूंचा योग्य पद्धतीने आणि मर्यादित वापर केल्यास धोका कमी करता येतो. कोणतीही वस्तू निश्चितपणे कॅन्सरला कारणीभूत आहे असा दावा करणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही.