Smart Car Key: कारच्या चावीमध्ये लपलेले आहेत हे 7 सिक्रेट फीचर्स; तुम्हालाही माहिती नसतील

Surabhi Jayashree Jagdish

कारच्या खिडक्या

कारमध्ये बसण्यापूर्वी चावीवरील अनलॉक बटण काही सेकंद दाबून ठेवा. असं केल्याने कारच्या सर्व खिडक्या आपोआप खाली उघडू शकतात. त्यामुळे उन्हात उभी असलेली कार वापरण्यापूर्वी आतील गरम हवा बाहेर काढता येते.

Car Remote Features | saam tv

खिडक्या आणि सनरूफ

कारमधून बाहेर पडल्यानंतर खिडकी उघडी राहिल्यास चावीवरील लॉक बटण काही सेकंद दाबून ठेवा. यामुळे कारच्या सर्व खिडक्या आपोआप बंद होऊ शकतात. काही कारमध्ये याच फीचरच्या मदतीने सनरूफसुद्धा बंद करता येते.

Smart Key Functions | saam tv

बॅटरी संपली तरी उघडता येतो दरवाजा

कारच्या रिमोटची बॅटरी संपल्यास चावीमध्ये असलेली छोटी मेटल की बाहेर काढता येतं. या चावीच्या मदतीने कारचा दरवाजा हाताने उघडता येतो. त्यामुळे रिमोट काम करत नसतानाही कारमध्ये प्रवेश करणे शक्य होते.

Car Window Control | saam tv

पार्किंगमध्ये सहज शोधता येते कार

मोठ्या पार्किंगमध्ये आपली कार नेमकी कुठे उभी केली आहे हे अनेकदा लक्षात राहत नाही. अशावेळी चावीवरील पॅनिक किंवा लॉक बटण काही सेकंद दाबून ठेवल्यास कारचा हॉर्न वाजू शकतो. त्याचवेळी कारचे दिवेही लागतात आणि त्यामुळे पार्किंगमध्ये गाडी शोधणं सोपं होतं.

Automatic Window Opening | saam tv

कारची डिक्की

कारच्या चावीवर डिक्कीसाठी बटण दिलेलं असतं. हे बटण दोनदा दाबल्यास किंवा काही सेकंद दाबून ठेवल्यास कारची डिक्की उघडू शकते. त्यामुळे सामान हातात असतानाही डिक्की उघडणे सोपे होते.

Remote Car Unlocking | saam tv

कारचं इंजिन

काही आधुनिक कारमध्ये रिमोट कीच्या मदतीने इंजिन आधीच सुरू करता येते. या फीचरमुळे कारमध्ये बसण्यापूर्वीच एसी सुरू करून केबिन थंड किंवा गरम करता येते. त्यामुळे कारमध्ये बसताना आतलं तापमान आरामदायी ठेवता येतं.

Car Boot Opening | saam tv

पुढे-मागे करता येते गाडी

काही आधुनिक आणि इलेक्ट्रिक कारमध्ये रिमोटच्या बटणाने गाडी पुढे किंवा मागे घेता येते. या फीचरमुळे अरुंद पार्किंगमध्ये गाडी बाहेर काढणं किंवा जागेत लावणं सोपं होतं. यासाठी कारमध्ये बसण्याची गरज नसते.

Remote Engine Start | saam tv

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

Car Engine Oil | saam tv
येथे क्लिक करा