Early Signs of Hypertension: पावसाळ्यात हाय बीपीची सुरुवातीची ही ७ लक्षणं दिसून येतात

Surabhi Jayashree Jagdish

वारंवार डोकेदुखी होणं

विशेषतः सकाळच्या वेळी डोक्याच्या मागील भागात किंवा संपूर्ण डोक्यात सतत दुखणं हे हाय बीपीचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. पावसाळ्यात अनेकजण ही डोकेदुखी हवामानातील बदलामुळे होत असल्याचं समजून दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार आणि कारण नसताना डोकेदुखी होत असल्यास रक्तदाब तपासून घेणं आवश्यक आहे.

Why No Sound in Space | saam tv

चक्कर येणं किंवा तोल जाणं

उच्च रक्तदाबामुळे मेंदूकडे होणाऱ्या रक्तप्रवाहात बदल होऊ शकतो. त्यामुळे चक्कर येण्याची तक्रार जाणवू शकते. अचानक उठल्यानंतर किंवा चालताना तोल जात असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

High Blood Pressure | saam tv

धूसर दिसणं किंवा दृष्टीत बदल जाणवणं

हाय बीपीमुळे डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो ज्यामुळे दृष्टी धूसर होण्याची शक्यता असते. काही वेळा काही सेकंदांसाठी अस्पष्ट दिसणं किंवा डोळ्यांसमोर काळे डाग दिसू शकतात. अशी लक्षणं दिसल्यास ती केवळ डोळ्यांचा त्रास समजून दुर्लक्षित करू नयेत.

Monsoon Health | saam tv

श्वास लागणं

थोडे चालल्यानंतर किंवा जिने चढताना नेहमीपेक्षा जास्त श्वास लागणं हेही हाय बीपीचे संकेत असू शकतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो त्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते.

Headache | saam tv

छातीत जडपणा

छातीत दाब जाणवणं, जडपणा जाणवणं किंवा अस्वस्थता हे उच्च रक्तदाबाशी संबंधित असू शकतं. हे लक्षण हृदयाशी संबंधित गंभीर समस्येचंही संकेत असू शकतं. त्यामुळे अशी लक्षणं जाणवल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Dizziness | saam tv

हृदयाचे ठोके अनियमित जाणवणं

हृदय जोरात धडधडत असल्याप्रमाणे वाटणं किंवा ठोके अनियमित जाणवणं हे काही व्यक्तींमध्ये हाय बीपीसोबत दिसू शकतं. पावसाळ्यात कॅफीनचं जास्त सेवन, ताण किंवा कमी झोप यामुळे ही समस्या अधिक जाणवू शकते.

Chest Discomfort | saam tv

सततचा थकवा

पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभर थकवा जाणवणं हे उच्च रक्तदाबाचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यास ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटू शकतं. हा थकवा अनेक दिवस कायम राहत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Shortness of Breath | saam tv

टीप

वरील माहिती ही सर्वसाधारण आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणतीही लक्षणं आढळल्यास स्वतः निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय खातरजमा केलेली नाही.

Heart health | saam tv

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

uncontrolled cell growth
येथे क्लिक करा