Manasvi Choudhary
समाजात वावरणाऱ्या पुरूष असो स्त्रिया वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्यावर मानसिक दडपत येते.
अशावेळी मानसिक खच्चीकरण झाल्याने अनेकदा त्यांच्याकडून टोकाचे निर्णय घेतले जातात.
अनेकजण बेरोजगारी, कर्ज यायारंख्या अडचणीमुळे आत्महत्या करण्याचा टोकाचे पाऊल उचलतात.
मात्र अशा घटना होऊ नये यासाठी 'टेली मानस' हेल्पलाइनद्वारे समुपदेशन केले जात आहे.
यामध्ये व्यक्तीला मानसिक उपचार मिळते. तसेच मनपरिवर्तन होते.
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरूषांचे प्रमाण अधिक आहे.
कौटुंबिक, व्यवसायिक आणि वैवाहिक अशा वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या केल्या जात आहेत.
मनावरील ताण कमी करण्यासाठी मित्रांमध्ये वेळ घालवणे, कुटुंबाशी गप्पा मारणे, यामुळे मनातील नकारात्मक विचार बदलतात.