Manasvi Choudhary
या ठिकाणी खवय्यांसाठी स्वस्तात मस्त टेस्टी फूड उपलब्ध आहेत.
चवदार पदार्थांसोबत मनाला तृप्त करणारे गारेगार डेझर्ट, वॅफल्स, आइस्क्रिम, ज्यूस येथे मिळतात.
खवय्यांना येथील स्ट्रीट स्टाईल मोमोजची चव चाखायला मिळते. जर तुम्ही मोमोजचे शौकीन असाल तर मालाडच्या फ्रिस्टर्स स्टॉलला भेट द्या
येथे मिळणारे स्ट्रीट स्टाईल पनीर मोमोज, सोया मोमोज तुम्हाला नक्की आवडतील.
मालाडची खाऊगल्ली खास मसाला खिचिया पापडसाठी प्रसिद्ध आहे.
भाजलेल्या किंवा तळलेल्या पापडवर चिरलेला टोमॅटो, कांदा , कोथिंबीर, काकडी, हिरवी चटणी आणि शेव टाकून चटपटीत खिचिया पापड तयार होतो.
जर तुम्हाला गोड खायला आवडत असेल तर तुम्ही स्ट्रीट स्टाईल वॅफल्स नक्की ट्राय करू शकता जे केवळ ५० रूपयांपासून उपलब्ध आहे.
मालाड खाऊगल्लीत हॅलो हायड्रेशन शॉपमध्ये हे एपिक सोडा शॉट मिळते. जे फुलजार सोडा म्हणून प्रसिद्ध आहे. या शॉपमध्ये सोड्याचे वेगवगळे फ्लेवर्स देखील मिळतात.
मालाडच्या खाऊगल्लीतील स्पायसी तंदूरी, पेरी पेरी, बीबीक्यू स्टाईल ट्विस्टर "कुरकुरीत बटाटा" म्हणून चांगलेच फेमस आहे.