Surabhi Jayashree Jagdish
सकाळी उठल्यानंतर काही मिनिटं शांत बसून लांब आणि खोल श्वास घेण्याची सवय लावा. यामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि मन शांत राहण्यास मदत होते. तसंच रक्ताभिसरण सुधारण्यास आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यासही याचा फायदा होतो.
सकाळी उठल्यानंतर किमान १ ते २ ग्लास कोमट पाणी पिणं फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि पचनक्रियेलाही चालना मिळते. काही अभ्यासांनुसार पुरेसे पाणी पिण्यामुळे शरीरातील अपायकारक द्रव्ये नैसर्गिक प्रक्रियेद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते.
शरीर एक्टिव्ह ठेवण्यासाठी दररोज १५ ते २० मिनिटे योग, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करा. यामुळे स्नायूंना लवचिकता मिळते आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो. नियमित शारीरिक हालचाल केल्याने एकूण आरोग्य आणि कार्यक्षमताही सुधारते.
सकाळच्या वेळेतील ताजी हवा शरीर आणि मनासाठी लाभदायक असते. सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशातून शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. यामुळे मूड ताजातवाना राहू शकतो आणि हाडांच्या आरोग्यालाही आधार मिळतो.
सकाळचा नाश्ता हा दिवसातील महत्त्वाचा आहार मानला जातो. नाश्त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरयुक्त संतुलित पदार्थांचा समावेश करणं अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे ऊर्जा टिकून राहते, भूक नियंत्रणात राहते.
सकाळच्या आरोग्यदायी सवयींचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ दिसून येतो. त्यामुळे सकाळच्या छोट्या बदलांमुळे दिवस अधिक उत्साही होऊ शकतो.
सकाळच्या सवयी बदलण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नसते, तर सातत्य महत्त्वाचं असतं. दररोज एक-एक चांगली सवय अंगीकारल्यास त्याचा सकारात्मक परिणाम हळूहळू जाणवू लागतो.