Heart attack prevention: हार्ट अटॅक टाळण्यासाठी कार्डिओलॉजिस्ट फॉलो करतात ६ सवयी; तुम्हीही आजच सुरू करा...

Surabhi Jayashree Jagdish

चुकीची लाईफस्टाईल

चुकीचा आहार, ताणतणाव, कमी शारीरिक हालचाल आणि अनियमित दिनचर्या यामुळे तरुणांमध्येही हृदयाशी संबंधित आजार वाढतंय. त्यामुळे वेळेत जीवनशैलीत बदल करून हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

Heart attack prevention | saam tv

रात्रीच्या जेवणानंतर पायी चाला

रात्री जेवल्यानंतर किमान दहा मिनिटं चालल्याने अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होतं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होतं. ही सवय दीर्घकाळ हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Healthy lifestyle | saam tv

सकाळचं कोवळं ऊन

सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी काही वेळ उन्हात बसण्याचा प्रयत्न करा. नैसर्गिक सूर्यप्रकाश शरीराचं बायोलॉजिक क्लॉक योग्य ठेवण्यास मदत करतो. यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो.

Cardiac health | saam tv

वजनासोबत बेली फॅटकडेही लक्ष द्या

केवळ वजन कमी असणं म्हणजे शरीर निरोगी आहे असं समजू नका. कंबरेभोवती वाढणारी चरबी ही हार्ट अटॅक धोका वाढवणारी महत्त्वाची बाब मानली जाते. त्यामुळे वजनासोबत कंबरेचा घेर आणि एकूण शारीरिक तंदुरुस्तीवरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

Daily heart care | saam tv

सकस आहार

ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि संतुलित आहार हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. योग्य आहार आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा असतो. आज पौष्टिक अन्नाची सवय लावल्यास भविष्यात औषधांवरील खर्चही कमी होऊ शकतो.

Healthy habits | saam tv

ताणतणावावर नियंत्रण मिळवा

सतत तणावाखाली राहिल्यास त्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. मानसिक आरोग्य चांगलं असेल तर हृदयाचं कार्यही अधिक चांगलं राहतं. त्यामुळे ध्यान, योग, छंद किंवा पुरेशी विश्रांती यांसारख्या उपायांनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.

Walking after dinner | saam tv

व्यायाम करा

दररोज चालणं, सायकल चालवणं किंवा हलका व्यायाम नियमित केल्यास हृदय अधिक मजबूत राहण्यास मदत होते. सातत्याने केलेली छोटी शारीरिक हालचालही दीर्घकालीन आरोग्यासाठी मोठा फायदा देऊ शकते.

Weight management | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

Balanced nutrition | saam tv
येथे क्लिक करा