Surabhi Jayashree Jagdish
पायांचे मसल्स म्हणजेच काल्फ मसल्स मजबूत असणं हे चालणं, धावणं आणि शरीराचा समतोल राखण्यासाठी खूप महत्त्वाचे असतं. कमजोर कॅल्फमुळे लवकर थकवा येतो आणि हालचालींची ताकद कमी होते. योग्य एक्सरसाईज केल्यास काल्फ मसल्स मजबूत राहतात.
या एक्सरसाईजमध्ये तुम्ही सरळ उभे राहून दोन्ही टाचांवर उचलून शरीर वर नेतात. यामुळे कॅल्फ मसल्सचा मुख्य भाग म्हणजे gastrocnemius मजबूत होतो. हे रोज केल्यास पायांची ताकद आणि स्थिरता वाढते.
या प्रकारात एका पायावर उभं राहून टाच वर-खाली केली जाते. यामुळे प्रत्येक पाय स्वतंत्रपणे मजबूत होतो आणि imbalance कमी होतो. ही एक्सरसाईज संतुलन आणि स्टॅबिलिटी सुधारते.
या एक्सरसाईजमध्ये बसलेल्या स्थितीत टाच वर उचलली जाते. यामुळे deep calf muscle म्हणजे soleus मसल मजबूत होतो. हे लांब वेळ चालण्याची क्षमता वाढवते.
यात तुम्ही टाच वर उचलून हळूहळू खाली आणता. ही स्लो मूव्हमेंट मसल्सवर अधिक ताण टाकते आणि ताकद वाढवते. यामुळे इजा होण्याचा धोका कमी होतो आणि मसल कंट्रोल सुधारतो.
स्किपिंग करताना सतत उड्या माराव्या लागतात ज्यामुळे कॅल्फ मसल्स एक्टिव्ह राहतात. ही कार्डिओ एक्सरसाईज ताकद आणि सहनशक्ती दोन्ही वाढवते. नियमित केल्यास पाय हलके आणि मजबूत होतात.
या एक्सरसाईजमध्ये तुम्ही बोटांवर चालत काही वजन हातात धरून चालता. यामुळे काल्फ मसल्सवर सतत ताण राहतो आणि ताकद वाढते. हे स्टॅमिना आणि बॅलन्स सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहे.