Braces Care: दातांवर ब्रेसेस लावल्यानंतर 'या' ५ सवयींमुळे होऊ शकते मोठे नुकसान

Dhanshri Shintre

जबड्याचा आकार सुधारतात

ब्रेसेस दात आणि जबड्याचा आकार सुधारतात, पण बसवल्यानंतर त्यांची नीट काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

काय टाळावे

ब्रेसेसची काळजी न घेतल्यास परिणाम कमी होतात, म्हणून ब्रेसेस लावल्यानंतर काय टाळावे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

पदार्थ खाऊ नका

ब्रेसेस असल्यास काजू, पॉपकॉर्न, चॉकलेट आणि च्युइंगमसारखे चिकट आणि कठीण पदार्थ टाळा, ते नुकसान करु शकतात.

कोल्ड्रिंक्स पिऊ नका

ब्रेसेस लावल्यानंतर सोडा किंवा कोल्ड्रिंक्स पिऊ नका; त्यामुळे दात खराब होण्याची आणि प्लेक वाढण्याची शक्यता असते.

कठीण वस्तू चावणे

दातांनी बाटलीचे झाकण उघडणे टाळा, कारण त्यामुळे दात तुटण्याची किंवा कमजोर होण्याची शक्यता वाढते.

कडक फळे

कडक फळे व भाज्यांमुळे ब्रेसेसला इजा होऊ शकते, त्यामुळे ती लहान तुकड्यांत कापूनच खाणे योग्य आहे.

स्वच्छता

ब्रेसेस लावल्यानंतर स्वच्छता अत्यावश्यक आहे; नीट स्वच्छ न केल्यास दातांमध्ये बॅक्टेरिया साचून समस्या निर्माण होऊ शकते.

NEXT: तोंडातून वाय येतो? घरच्या घरी करा 'हे' सोपे आणि प्रभावी उपाय

येथे क्लिक करा