Dhanshri Shintre
जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप किंवा १-२ वेलची चावल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
मोहरीच्या तेलात थोडं मीठ मिसळून रोज एकदा हिरड्यांना मालिश केल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि हिरड्या मजबूत राहतात.
सकाळी ब्रश केल्यानंतर लवंग दातांवर धरल्याने अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे दुर्गंधी कमी होते. टूथपेस्टमध्ये लवंग तेल घालूनही चांगला परिणाम होतो.
सकाळ-संध्याकाळ ब्रश केल्यानंतर तुरटीच्या पाण्याने तोंड धुतल्यास दुर्गंधी दूर होते आणि हिरड्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टीमधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील दुर्गंधी दूर करण्यात प्रभावी ठरतात, त्यामुळे नियमितपणे ग्रीन टी घेतल्यास तोंड ताजं आणि स्वच्छ राहते.
लिंबूमध्ये असणारे नैसर्गिक आम्ल तोंडातील घाण वास निर्माण करणारे जीवाणू नष्ट करते आणि श्वासाला ताजेपणा प्रदान करते.
जेवणादरम्यान अर्धा लिंबू चोखल्यास तोंडातील वास कमी होतो, दात स्वच्छ होतात आणि त्यातील पिवळेपणा कमी होण्यास मदत होते.