No More Smoking: धूम्रपान थांबवल्यानंतर शरीर कसे सुधारते? जाणून घ्या आरोग्यावर होणारे फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीपी कमी होतो

धूम्रपान सोडल्यानंतर ८ तासांत बीपी कमी होतो, आणि २४ तासांत हृदयविकाराचा धोका कमी होऊन हृदयाला ऑक्सिजन मिळणे सुधारते.

रक्त अधिक पंप

धूम्रपान सोडल्यानंतर २४ तासांत हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदयाला ऑक्सिजनसाठी रक्त अधिक पंप करण्याची गरज भासत नाही.

विषारी पदार्थ बाहेर पडतात

धूम्रपान सोडल्यानंतर ४८ तासांत फुफ्फुसातील निकोटिन आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात; थोडी डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो.

फुफ्फुसे मजबूत होतात

धूम्रपान सोडल्यानंतर २ आठवड्यांपासून ३ महिन्यांपर्यंत फुफ्फुसे मजबूत होतात, सामान्य होतात आणि रक्ताभिसरणही सुधारण्यास सुरुवात होते.

हृदयरोगाचा धोका कमी

धूम्रपान थांबवल्यानंतर एक वर्षात हृदयरोगाचा धोका अर्ध्याने कमी होतो आणि आरोग्य सुधारतो.

कर्करोगाचा धोका कमी

धूम्रपान सोडल्यानंतर पाच वर्षांनी तोंड, अन्ननलिका, मूत्राशय आणि घशाचा कर्करोगाचा धोका निम्मा होतो; स्ट्रोक आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा धोकाही कमी होतो.

शरीर तंदुरुस्त होते

धूम्रपान सोडल्यानंतर १५ वर्षांनी शरीर पूर्णपणे तंदुरुस्त होते आणि हृदयविकाराचा धोका धूम्रपान न केलेल्यांसारखा जवळजवळ शून्यावर येतो.

NEXT: सततची चिंता सोडवण्यासाठी जाणून घ्या १० उपयुक्त टिप्स

येथे क्लिक करा