ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीचे दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला खास व्रत करतात.
पौराणिक कथेनुसार, सावित्रीने वटवृक्षाखाली बसून तपश्चर्या करून पतीचे प्राण वाचवले होते, म्हणून वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा केली जाते.
वटपौर्णिमेला पूजा करताना महिलेची ओटी भरली जाते त्यावेळी पाच फळांचा वापर केला जातो.
वटपौर्णिमेच्या पूजेत आंबा या फळांचा वापर केला जातो.
वटपौर्णिमेला तुम्ही बाजारात सहज मिळणाऱ्या चिकूंचा वापर करू शकता.
वटपौर्णिमेच्या पूजेला फणसाचे विशेष महत्त्व आहे. फणसाचे गरे बाजारात सहज मिळतात.
वटपौर्णिमेची पूजा करताना तुम्ही पेरू वापरू शकता.
पावसाळा सुरु होताच जाभूळ पिकायला लागतात त्यामुळे वटपौर्णिमेच्या पूजेला जांभूळ देखील वापरू शकता