ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही लोकांना दिवसभरात अनेकवेळा गोड पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु याचा आरोग्यावर परिणाम देखील होऊ शकतो.
कोणत्या लोकांनी आपल्या आहारात गोड पदार्थांचा समावेश करु नये, जाणून घ्या.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि यासाठी तुम्ही डाएटिंग करत असाल तर अशावेळी गोड पदार्थ खाणं टाळा.
ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे, त्यांनी अधिक प्रमाणात गोड खाणं टाळावे.
जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने शरीरात खराब कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते.
डायबिटीजच्या रुग्णांनी अजिबात गोड पदार्थांचे सेवन करु नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
जर तुम्हाला दातांमध्ये कॅव्हिटी किंवा किड असेल तर गोड पदार्थ खाऊ नका.