Konkan Tourism: शांत अन् सुंदर ठिकाण, कोकणातील 'या' नयनरम्य ठिकाणाला एकदा भेट द्याच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग, कोकण

मालवण किनाऱ्यावरील बेटावरील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन सिंधुदुर्ग हे नाव ठेवण्यात आले. सिंधुदुर्गाचा अर्थ समुद्रातील किल्ला असा होतो.

konkan | freepik

नैसर्गिक सुंदरता

ऐतिहासिक महत्व, सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याची भूमी म्हणून ओळख असणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही धार्मिक स्थळे, कोसळणारे धबधबे, निळेशार समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकता.

konkan | freepik

सिंधुदुर्ग किल्ला

अरबी समुद्रात ४८ एकरांवर बांधण्यात आलेल्या या भव्य किल्ल्याला भेट द्यायला विसरु नका. ऐतिहासिक महत्वापलिकडे समुद्राच्या मध्यभागी या किल्ल्यावरुन नयनरम्य दृश्यांचा अनुभव घेऊ शकता.

konkan | google

आंबोली घाट

ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांसाठी हे नयनरम्य ठिकाण प्रसिद्ध आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान अनेक पर्यटक येथे येतात.

konkan | google

अरसे महल बीच

सिंधुदुर्गातील लपलेले एक नयनरम्य ठिकाण म्हणजे अरसे महल बीच. येथील शांत वातावरण आणि सुंदरता तुमच्या मनाला भुरळ घालतील.

google | yandex

वेंगुर्ला मालवण बीच

इतर बीचपेक्षा येथे पर्यटकांची कमी गर्दी पाहायला मिळते. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांततापूर्ण वेळ घालवायचा असेल तर येथे नक्की भेट द्या.

konkan | SAAM TV

त्सुनामी बेट

अॅडव्हेंचर प्रेमींसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. तुम्ही येथे केळी बोट राईट्स, कायाकिंग जेट स्कीइंग, आणि बंपर बोटिंग सारख्या वॉटर स्पोर्टचा आणि इतर अॅक्टिव्हिटिजचा आनंद घेऊ शकता.

konkan | freepik

NEXT: दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत 'हे' पदार्थ, आजच खाणं टाळा

Teeth Health | Saam TV
येथे क्लिक करा