ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लीची हे फळ चविष्ट असण्यासह आरोग्यासाठी पोष्टिक देखील आहे. परंतु काही लोकांसाठी लीची खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं, जाणून घ्या.
लीचीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. मधुमेही रुग्णांनी या फळाचे सेवन करु नये.
काही लोकांना लीची खाल्ल्याने खाज येणे किंवा त्वचेवर डाग येणे यासारखे अॅलर्जी होऊ शकते.
लीची हे फळ रिकाम्या पोटी खाल्ल्याने मळमळणे किंवा उलटी येणे सारखे त्रास होऊ शकतात.
अतिप्रमाणात लीचीचे सेवन केल्याने मुलांमध्ये हायपोग्लायसेमिया होऊ शकतो.
जर तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल तर लीचीचे सेवन करु नये.
लीचीमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो.