ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना हातापायांवर टॅटू काढायला आवडते. परंतु तुम्हाला माहितीये का टॅटू काढल्याने शरीरावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
टॅटू काढल्यानंतर अनेकांना त्वचेशी संबंधित समस्या होतात. त्वचेची जळजळ आणि खाज सुटणे यासारख्या ऍलर्जीक प्रतिक्रिया येऊ शकतात.
टॅटू काढल्यानंतर संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त असतो. टॅटू काढताना, तुमची साधने पूर्णपणे स्वच्छ आहेत का ते नेहमी तपासा. असे केल्याने तुम्ही संसर्ग टाळू शकता.
टॅटू काढल्याने हेपेटायटीस आणि एचआयव्ही सारख्या रक्ताच्या आजारांचा धोका वाढू शकतो.
टॅटू काढल्याने त्वचेची संवेदनशीलता वाढू शकते, ज्यामुळे त्वचेला वेदना आणि जळजळ होऊ शकते.
जर तुम्हाला टॅटू काढायचा असेल तर ही एक वेदनादायक प्रक्रिया असू शकते ज्यासाठी अनेक वेगवेगळ्या केमिकलचीआवश्यकता असू शकते.
कधीकधी टॅटूचा तुमच्या नोकरीवरही परिणाम होऊ शकतो. जर तुमचा टॅटू दिसत असेल तर सरकारी नोकरी मिळणे कठीण असते.