kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Surabhi Jayashree Jagdish

किडनीचं आरोग्य

आजकाल किडनीच्या आजारांचं प्रमाण वाढताना दिसतंय. चुकीची जीवनशैली, मद्यपान, वाढतं वय आणि इतर आरोग्य समस्या यांचा थेट परिणाम किडनीवर होत असतो. शरीरातील घातक द्रवंये आणि विषारी घटक बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं किडनी करते.

ginger mint tea kidney

ड्रिंक्स

किडनी निरोगी ठेवण्यासाठी फक्त भरपूर पाणी पिणं पुरेसं नाही. काही नैसर्गिक ड्रिंक्स किडनीचं कार्य सुधारण्यास आणि भविष्यातील आजारांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

celery juice benefits

आलं-पुदिन्याचा चहा

आलं आणि पुदिना एकत्र उकळून तयार केलेला चहा केवळ पचनासाठीच फायदेशीर नसून किडनीसाठी उपयुक्त मानला जातो. आल्यामध्ये असलेले जिंजरॉलसारखे घटक शरीरातील सूज कमी करण्याचे काम करतात. किडनीच्या इन्फ्लामेशनचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे पेय फायदेशीर ठरू शकतं.

natural kidney cleanse

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक किडनीच्या पेशींचं रक्षण करण्यास मदत करतात. काही संशोधनांनुसार नियमित ग्रीन टी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये किडनी स्टोनचा धोका कमी होऊ शकतो.

urinary system health

त्रिफळा

आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन फळांपासून तयार होणारा त्रिफळा आयुर्वेदात अनेक वर्षांपासून महत्त्वाचा मानला जातो. संशोधनांमध्येही त्रिफळ्यातील व्हिटॅमिन सी आणि गॅलिक अॅसिडसारख्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होत असल्याचं दिसून आलंय.

triphala benefits health

सेलरीचा ज्यूस

सेलरी ही नैसर्गिकरित्या डाययुरेटिक गुणधर्म असलेली भाजी आहे. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त द्रव आणि घातक घटक बाहेर टाकण्यास मदत मिळते. सेलरीमध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात, जे किडनीतील इन्फ्लामेशन कमी करण्यास मदत करतात.

plant based drinks health

डॅंडेलियन रूट टी

डॅंडेलियन रूट टी हे आणखी एक नैसर्गिक पेय आहे, जे शरीरातील अतिरिक्त द्रव आणि टॉक्सिन पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकण्यास मदत करतं. हे पेय किडनीबरोबरच लिव्हरसाठीही फायदेशीर ठरतं. ते किडनीच्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात.

anti inflammatory drinks

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा