ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईपासून अगदी जवळ नवी मुंबई हे शहर आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध स्थळे आहेत.
शांतता आणि निसर्गाच्या वातावरणासाठी मुंबईपाहून अगदी जवळ येथे पर्यटक भेट देतात.
नवी मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे तुम्ही नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पनवेलमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. विविध प्रकारच्या पक्षी प्रजाती पाहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
हिरवीगार निसर्गरम्यता आणि फिरण्यासाठी या टेकड्या आहेत. पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
नेरूळ तलाव नवी मुंबईतील सुंदर ठिकाण आहे. निळाशार पाणी आणि शांतता येथे अनुभवायला मिळते.
नवी मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेला बेलापूर किल्ला आहे. इंग्रजांच्या काळात या किल्ल्याची निर्मीती झाली आहे.