High blood pressure: रात्री झोपण्यापूर्वीच्या या 5 सवयी बीपी नियंत्रणात ठेवण्यास करतील मदत

Surabhi Jayashree Jagdish

कमी झोप

पुरेशी झोप न मिळाल्यास किंवा झोपेची गुणवत्ता खराब असल्यास उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो. अशा स्थितीत शरीरातील हार्मोन्स, हृदयाचे ठोके आणि रक्तवाहिन्यांचं कार्य हळूहळू बिघडू शकतं. दीर्घकाळ ही समस्या कायम राहिल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

Healthy sleep | saam tv

झोपेची कमतरता

सकाळी उठल्यानंतर डोळे लाल होणं किंवा जड वाटणं ही झोपेच्या कमतरतेची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. यासोबत डोकेदुखी, सतत अस्वस्थ वाटणं किंवा दिवसभर थकवा जाणवू शकतो. ही लक्षणं दिसल्यास झोपेच्या सवयींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

Heart health | saam tv

दररोज एकाच वेळी झोपा आणि उठा

दररोज शक्यतो एकाच वेळी झोपणं आणि उठणं शरीराचं Body Clock नियमित ठेवतं. अनियमित झोपेमुळे ताण वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होऊन रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. नियमित झोपेचं वेळापत्रक हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत करते.

Sleep schedule | saam tv

झोपेची क्विलिटी

फक्त जास्त वेळ झोपणं पुरेसं नसून गाढ आणि अखंड झोप घेणं अधिक महत्त्वाचे आहे. रात्री वारंवार जाग येणं किंवा झोप पूर्ण न होणं यामुळे मज्जासंस्था सतत तणावाच्या स्थितीत राहते. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येऊन रक्तदाब वाढू शकतो.

Deep sleep | saam tv

झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर टाळा

झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा जास्त वापर केल्यास मेलाटोनिन या झोपेसाठी आवश्यक हार्मोनचे उत्पादन कमी होतं. स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश झोप लागण्यास अडथळा निर्माण करतो. परिणामी झोपेची क्वॉलिटी खालावून रक्तदाब नियंत्रणात ठेवणं कठीण होऊ शकते.

Sleep apnea | saam tv

रात्री उशिरा हेवी जेवणं

झोपण्याच्या अगोदर हेवी जेवण, जास्त चहा-कॉफी किंवा मद्यपान केल्यास पचन आणि झोप दोन्हीवर परिणाम होतो. मद्यपानामुळे सुरुवातीला झोप आल्यासारखं वाटलं तरी गाढ झोपेचा कालावधी कमी होतो.

Screen time | saam tv

घोरणं

मोठ्याने घोरणं, झोपेत गुदमरल्यासारखे वाटणं किंवा दिवसभर जास्त झोप येणं ही स्लीप अॅप्नियाची लक्षणे असू शकतात. स्लीप अॅप्नियाचा संबंध नियंत्रणात न राहणाऱ्या उच्च रक्तदाबाशी जवळचा आहे.

Night sleep | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

Note | pinterest
येथे क्लिक करा