Nashik City: नाशिकमध्ये स्वर्गसुख अनुभवायचय? मग या प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या

Manasvi Choudhary

नाशिक

नाशिक हे शहर प्रसिद्ध ठिकाण आहे. नाशिक शहराला जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे म्हणूनच विविध ठिकाणाहून पर्यटक नाशिक शहराला भेट देतात.

Nashik City Name History

पर्यटकांची होते गर्दी

नाशिक हे गोदावरी कुशीत वसलेलं एक तिर्थक्षेत्र आहे. नाशिकमधील गोदावरीचा घाट, त्र्यंबकेश्वर, पंचवटी ही प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.

Nashik

त्र्यंबकेश्वर

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्र्यंबकश्वेर हे नाशिकमधील ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं ठिकाण आहे.

त्र्यंबकेश्वर

रामकुंड

रामकुंड हे ठिकाण नाशिकमधील गोदावरी नदीच्या पात्रात बांधण्यात आलेलं आहे. असं म्हणतात वनवासात असताना प्रभू रामचंद्र या ठिकाणी स्नान करत होते ज्यामुळे रामकुंडाला पवित्र स्थळ मानलं जातं.

Nashik

सप्तश्रृंगी देवीचे मंदिर

नाशिक जिल्ह्यात वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे मंदिर आहे. पौराणिक कथांमध्ये १०८ शक्तीपीठांचा ज्यात उल्लेख केला आहे.

Saptashrungi | google

अख्यायिका

अख्यायिकेनुसार, नाशिकमध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास केला होता.

nashik | google

लक्ष्मण आणि शूर्पणखा यांच्यातला वाद

रामाच्या वनवासादरम्यान लक्ष्मण आणि शूर्पणखा यांच्यात वाद झाला होता. यावेळी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक कापले होते म्हणून शहराला नाशिक असे नाव पडले.

nashik | google

next: Mula Bhaji Benefits: थंडीत मुळ्याची भाजी खा अन् हे ५ आजार कायमचे दूर करा

येथे क्लिक करा...