Surabhi Jayashree Jagdish
किडनीची कार्यक्षमता ५० टक्क्यांपर्यंत कमी होईपर्यंत अनेक रुग्णांना कोणतीही ठळक लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात आजाराचं निदान करणं कठीण ठरत. म्हणूनच नियमित आरोग्य तपासणी करून किडनीची कार्यक्षमता वेळोवेळी तपासणं महत्त्वाचं आहे.
कामाचा ताण, झोपेचा अभाव, चुकीचा आहार आणि वाढतं लठ्ठपण यामुळे उच्च रक्तदाब व मधुमेहाचं प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे. हे दोन्ही आजार किडनीवर दीर्घकाळ गंभीर परिणाम करू शकतात
मधुमेह हा किडनी निकामी होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक मानला जातो. अनेकजण किडनीतील पथरीला किरकोळ समस्या समजून उपचार टाळतात, मात्र त्यामुळे किडनीला कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं.
दररोज चालणं, नियमित व्यायाम करणं आणि एक्टिव्ह जीवनशैली ठेवणं किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. शारीरिक हालचालींमुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसंच जिममध्ये स्टेरॉइड्स, प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट्सचा अतिरेक टाळणंही महत्त्वाचं आहे.
भूक लागली म्हणून वारंवार जंक फूड, जास्त मीठ किंवा प्रोसेस केलेले पदार्थ खाण्याची सवय किडनीवर अतिरिक्त ताण आणू शकते. अशा आहारामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
रोज उशिरापर्यंत जागरणं आणि पुरेशी झोप न घेणं या गोष्टी तुमच्या शरीरावर परिणाम करतात. अपुऱ्या झोपेमुळे ताण वाढतो आणि उच्च रक्तदाब तसंच चयापचयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
डोकेदुखी किंवा अंगदुखीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार पेनकिलर औषधं घेणं किडनीला हानी पोहोचवू शकते. दिवसभर बसून राहणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही लठ्ठपणा, मधुमेह व उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.