Manasvi Choudhary
ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ठाणे शहरात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
ठाण्यातील तलावपाळी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. तलावाच्या शेजारी खास तुम्ही पाटर्नरसह, लहान मुलांसोबत वेळ घालवू शकता.
ठाण्यात येऊर हिल्स एक डोंगराळ भाग आहे. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. मुंबई, कर्जत येथून पर्यटक येथे खास भेट देतात.
पावसाळ्यात मामाभांजा हिल्सला पर्यटक भेट देतात. डोंगरदऱ्याच्या या भागात पाण्याचे छोटे छोटे झरे वाहतात. बघण्यासारखे हे दृश्य मनाला मोहून टाकते.
बोरिवली आणि ठाणे अश्या दोन्ही मार्गांना जोडलेला संजय गांधी नॅशनल पार्क आहे येथे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जोडिदारासोबत, कुटुंबियासोबत एक दिवसाची पिकनीक करू शकता.
ठाण्यातील गायमुख चौपाटी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. ठाणे स्टेशनपासून अगदी जवळ १ किलोमीटर अतरांवर हे ठिकाण आहे.गायमुख चौपाटी येथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही बोटिंगचा आनंद घ्या
प्रतितुळजापूर अशी ओळख असलेले तुळजाभवानी देवीचे मंदिर ठाण्यात आहे. ठाणे स्टेशनपासून १ किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून भाविकांची गर्दी असते.
कोपिनेश्वर मंदिर हे ठाणे शहरातील एक प्रसिद्ध प्राचीन शिव मंदिर आहे, जे ठाण्याचे ग्रामदैवत मानले जाते. हे मंदिर मासुंदा तलावाच्या काठावर आहे आणि तेथील शिवलिंग हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे
द वॉक भारताचे पहिले टेकडीवरचे निवासी स्थान आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॅफे, रेस्टॉरंट, सुपरमार्केट आणि अनेक सुविधा आहे. या ठिकाणी तुम्ही ओपन-एअर शॉपिंग मॉलचा अनुभव घेऊ शकता.
चौपाटीच्या समोर एका डोंगरावर स्थित असलेले हे मंदिर पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. कालीबारी मंदिर देखील ठाण्याच्या पूर्व उपनगरांतील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.