Tanvi Pol
सातारा शहराच्या नावाची उत्पत्ती ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भांशी जोडलेली आहे.
सातारा जिल्ह्यात दररोज अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.
मात्र तुम्हाला सातारा हे नाव कसे पडले ते माहिती आहे का?
सातारा हे सात गड-किल्ल्यांनी वेढलेले शहर आहे.
या किल्ल्यांमुळे या भागाला 'सात तारे' असे नाव पडले आणि कालांतराने ते सातारा असे उच्चरित झाले.
हे सात किल्ले म्हणजे अजिंक्यतारा, सज्जनगड, वसंतगड, मंगळगड, कासारगड, पांडवगड आणि वैराटगड.
काही ऐतिहासिक साधनांनुसार, सात तारे या संकल्पनेतून सातारा हे नाव आले असावे.