Dhanshri Shintre
भारताची एक खास जागा अशी आहे जिथे घर, दुकान, बँक कुठेही कुलूप लावण्याची गरज भासत नाही.
चला जाणून घेऊया अशा गावाबद्दल जिथे लोक दरवाजे न लावता निर्धास्तपणे आयुष्य जगतात.
महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर हे गाव प्रसिद्ध आहे कारण येथे घरांना दरवाजेच नसतात, तरीही चोरी होत नाही.
मान्यता आहे की शनिदेव स्वतः गावाचे रक्षण करतात, त्यामुळे चोरही चोरी करण्याची हिंमत करत नाहीत.
आजही या गावातील घरे, दुकाने आणि बँका दरवाजेविना असूनही तेथे सुरक्षा आणि शांती अबाधित आहे.
मुसळधार पावसानंतर सापडलेल्या काळ्या दगडामुळे गावप्रमुखाला स्वप्नात दर्शन देत शनिदेवांनी मंदिर बांधण्याचा आदेश दिला.
मान्यता आहे की शनिदेवांनी सांगितले होते, मी गावाचे स्वतः रक्षण करीन, मला मंदिरासाठी भिंती नकोत.
त्यादिवसापासून आजपर्यंत या गावात एकाही चोरीची घटना घडलेली नाही, हे खरोखरच अद्भुत आहे.