Chetan Bodke
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्नाने २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणावर बॉलिवूड गाजवलं.
'योद्धा', 'अरनामनाई ४' आणि 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटामध्ये राशीने काम केले आहे.
तिच्या अभिनयासोबतच कायमच तिच्या फॅशनचीही कायमच इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होत असते.
सध्या राशी 'द साबरमती रिपोर्ट'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनवेळी खास स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत तिने उपस्थिती लावली होती.
बॅक सॅटिन ड्रेसमध्ये राशी खूपच सुंदर दिसत असून तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
राशी कायमच आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिच्या फॅशनचे नेहमीच कौतुक होत असते.
बन, हटके फोटो पोजेस आणि फॅशनमुळे अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.
राशी फारच ग्लॅमरस दिसत असून हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.