Surabhi Jayashree Jagdish
मृत्यू हे एक अटळ सत्य असून प्रत्येक धर्म आणि संस्कृतीची त्याच्याशी संबंधित श्रद्धा आणि प्रथा आहेत.
हिंदू धर्मात ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या पायाच्या बोटाभोवती धागा बांधला जातो.
मृत्यूनंतर पायाची बोटं का बांधली जातात, हे तुम्हाला माहिती आहे का?
हिंदू धर्मात असं मानलं जातं की, पायाच्या बोटांना धागा बांधल्याने आत्म्याला शांती मिळते.
काही मान्यतेनुसार, मृत्यूनंतर ऊर्जा शरीरातून बाहेर पडते. पायाची बोटे बांधल्याने ही ऊर्जा नियंत्रित राहण्यास मदत होते.
हिंदू धर्मात मूलाधार चक्र हे जीवन उर्जेचे केंद्र मानले जाते आणि पायाच्या बोटांवर धागा बांधल्याने हे चक्र स्थिर होते.
मृत्यूनंतर शरीर ताठ होते, त्यामुळे पायाची बोटं वाकडी होऊ शकतात. पायाची बोटे बांधल्याने शरीर सरळ राहण्यास मदत होते.
या ठिकाणी देण्यात आलेल्या गोष्टी सामान्य माहितीवर आधारित असून आम्ही त्याची खातरजमा करत नाही.