ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या अनेकजण असे आहेत ज्यांना, अकाली केस पांढरे होण्याची समस्या जाणवते.
जर तुम्हालाही अवेळी पांढऱ्या केसांची समस्या जाणवत असल्यास खालील घरगुती उपाय ट्राय करा.
कोरा चहाचे पाणी थंड करुन ते काही वेळ केसांना लावावे, याने केस काळे होण्यास फायदेशीर ठरते.
मेथीच्या दाण्याच्या पावडरच्या साहाय्याने अकाली पांढरे पडलेले केस काळे होण्यास मदत होते.
कढीपत्ताच्या मदतीनेही अकाली पांढऱ्या केसांची वाढ रोखता येते.
खोबरेल तेलाच्या मदतीने तुम्हाला अकाली पांढऱ्या केसांपासून सुटका मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.