Surabhi Jayashree Jagdish
थंडीच्या दिवसात मालाड परिसर फिरण्यासाठी अतिशय सुंदर आहे. कारण या ठिकाणंचं हवामान काहीसं थंड असतं आणि गर्दीही तुलनेने कमी असते. निसर्ग, समुद्र, टेकड्या आणि शांत ठिकाणं यांचा उत्तम संगम मालाडमध्ये पाहायला मिळतो.
थंडीमध्ये आरे कॉलनी हिरवळीने भरलेली आणि शांत असते. मॉर्निंग वॉक, सायकलिंग आणि निसर्ग दर्शनासाठी उत्तम ठिकाण आहे.
हिवाळ्यात मार्वे बीचवर समुद्र शांत आणि स्वच्छ दिसतो. सनसेट पाहण्यासाठी आणि निवांत बसण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. गर्दी कमी असल्यामुळे फोटोग्राफीसाठीही योग्य ठिकाण आहे.
हे छोटंसं मासेमारी गाव थंडीमध्ये अधिक सुंदर दिसतं. जुनी पोर्तुगीज शैलीची चर्च आणि समुद्रकिनारा पाहता येतो. शांत आणि वेगळा अनुभव हवा असेल तर हे ठिकाण खास आहे.
मालाडहून जवळ असलेला हा भाग हिवाळ्यात फारच रमणीय वाटतो. खाडी, बोटिंग आणि निसर्गसौंदर्य पाहायला मिळतं.
थंडीच्या दिवसात फिरत-फिरत शॉपिंग आणि खाण्याचा आनंद घेता येतो.मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे.
हिवाळ्यात संध्याकाळी माइंडस्पेसचा परिसर फिरायला छान वाटतो. रुंद रस्ते, कॅफे आणि ओपन स्पेसेस यामुळे वातावरण खुलं वाटतं. ऑफिसनंतर रिलॅक्स होण्यासाठी हा भाग योग्य आहे.