Surabhi Jayashree Jagdish
हिंदू धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार केले जातात.
ज्यामध्ये संपूर्ण शरीराला अग्नी दिला जातो आणि त्यानंतर त्याची राख होते.
पण तुम्हाला माहितीये का की, मानवी शरीराचा कोणता भाग अग्नीमध्ये राख होत नाही?
दात हा मानवी शरीराचा एक भाग आहे जो अग्नीमध्ये जळत नाही.
आपल्या दातांमध्ये कॅल्शियम फॉस्फेट आढळतं, त्यामुळे ते अग्नीमध्ये जळत नाही.
अंतिम प्रक्रियेदरम्यान दाताचा मऊ भाग जळतो पण कडक भाग जळत नाही.
दातांव्यतिरिक्त नखं देखील योग्य प्रकारे राखेत रूपांतरित होत नाहीत.