Shreya Maskar
सुट्टीत मित्रमंडळींसोबत फिरण्यासाठी 'नवेगाव बांध अभयारण्य' हे बेस्ट लोकेशन आहे.
गोंदिया जिल्ह्यात सुंदर 'नवेगाव बांध अभयारण्य' आहे.
अभयारण्यात तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती पाहायला मिळतात.
अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, लांडगा असे वेगवेगळे प्राणी आहेत. तसेच सरपटणारे प्राणी देखील आढळतात.
नवेगाव तलाव हे नवेगाव बांध अभयारण्याचे एक प्रमुख आकर्षण आहे.
नवेगाव तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
नवेगाव तलाव हे अभयारण्यात असून पर्यटक येथे फोटो काढण्यासाठी आवर्जून येतात.
विविध रंगाचे आकर्षक पक्षी येथे पाहायला मिळतात. त्यामुळे पक्षी प्रेमींनी अभयारण्याला आवर्जून भेट द्या.