Surabhi Jayashree Jagdish
भारतातील ताजमहाल हा जगातील ७ आश्चर्यांपैकी एक मानला जातो.
इतिहासकारांच्या सांगण्यानुसार, ज्यावेळी ताजमहाल बांधण्यात येत होता तेव्हा मुघल बादशाह शाहजहांने ताजमहालइतकं शुद्ध, स्वच्छ आणि पांढरा गोड पदार्थ बनवण्यास सांगितलं होतं.
राजाच्या आज्ञेचं पालन करून स्वयंपाक करणाऱ्यानी पांढऱ्या भोपळ्याच्या मदतीने गोड पदार्थ बनवला.
ताजमहालसोबतच हा गोड पदार्थ आग्राची ओळखही बनेल हा त्यावेळी कोणी विचारही केला नसेल.
हा बनवलेला गोड पदार्थ आज पेठा म्हणून ओळखला जातो. आज आग्र्यात ५६ पेक्षा जास्त प्रकारचे पेठे बनवले जातात.
उन्हाळ्यात ताजमहालचं काम करणाऱ्या कामगारांना खूप त्रास सहन करावा लागला.
त्यावेळी राजाने कामगारांना ऊर्जा वाढवणारा पदार्थ म्हणून पेठा देण्याचा आदेश दिला होता.