World Longest Road: जगातील सर्वात लांब रस्ता! तब्बल ३०,००० किलोमीटर अंतर कापतो, वाचा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वात लांब रस्ता

पॅन-अमेरिकन हायवे हा जगातील सर्वात लांब रस्ता असून, अलास्काच्या प्रुधो बेपासून अर्जेंटिनाच्या उशुआया पर्यंत जातो.

किती किलोमीटर लांब

पॅन-अमेरिकन महामार्ग साधा नाही, तो तब्बल ३०,००० किलोमीटर लांब पसरलेला अवाढव्य जागतिक रस्ता आहे.

१४ देशांना जोडणारे

हा रस्ता अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोपासून अर्जेंटिना पर्यंत १४ देशांना जोडणारे जागतिक महामार्गाचे अद्भुत जाळे आहे.

पॅन-अमेरिकन हायवे

रोड ट्रिप प्रेमींसाठी पॅन-अमेरिकन हायवे स्वप्नासारखा असला तरी, अनेक अडथळे आणि आव्हानंही इथे वाट पाहत असतात.

संकटांचा धोका

पॅन-अमेरिकन हायवेवर दरड कोसळणे, पूर येणे आणि इतर नैसर्गिक संकटांचा धोका सतत संभवतो, त्यामुळे प्रवास काळजीपूर्वक करावा.

एक वर्ष

या महामार्गावरून पूर्ण प्रवास करायचा झाल्यास, व्यक्तीला एक महिना ते तब्बल एक वर्षही लागू शकते.

आशियाई महामार्ग १

पॅन-अमेरिकन महामार्गानंतर, आशियाई महामार्ग १ (AH1) हा जगातील दुसरा सर्वात लांब रस्ता असून तो २०,५५७ किलोमीटरचा आहे.

NEXT: गुगल मॅप वापरताना तुम्ही करताय का ही चूक? ठेवा 'या' गोष्टी लक्षात

येथे क्लिक करा