Google Map: गुगल मॅप वापरताना तुम्ही करताय का ही चूक? ठेवा 'या' गोष्टी लक्षात

Dhanshri Shintre

गुगल मॅप

डिजिटल युगात प्रवास सोपा करण्यासाठी गुगल मॅप हे एक उपयुक्त आणि विश्वासार्ह मार्गदर्शक साधन बनले आहे.

पाच गोष्टी

पण आम्ही सांगितलेल्या या पाच गोष्टी लक्षात ठेवन वापरल्यास तुमचा प्रवास अधिक सुरक्षित, सोपा आणि आनंददायी होईल.

अत्यंत सोयीस्कर

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात गुगल मॅप हे प्रवासादरम्यान दिशा दाखवणारे अत्यंत सोयीस्कर आणि उपयुक्त साधन ठरले आहे.

ऑफलाईन मॅपचा वापर करा

प्रवास करताना मोबाईल नेटवर्क सिग्नल न मिळाल्याने अनेक वेळा गुगल मॅप काम करत नाही. म्हणून तुमच्या प्रवासाच्या भागाचा मैप आधीच डाऊनलोड करून ठेवा.

लाईव्ह ट्रैफिक अपडेटस्ची माहिती घ्या

गुगल मॅप्समध्ये ट्रॅफिक माहिती रंगांच्या माध्यमातून दिली जाते, हिरवा मार्ग मोकळा, पिवळा मध्यम वाहतूक, तर लाल रंग गती कमी असल्याचे दर्शवतो.

व्हॉईस नेव्हिगेशन वापरा

गाडी चालवताना किंवा पायी जाताना स्क्रीनकडे पाहणे धोकादायक ठरते, त्यामुळे सुरक्षिततेसाठी गुगल मॅप्सचे व्हॉईस नेव्हिगेशन वापरणे अधिक योग्य ठरते.

स्थानिक रिव्ह्यू आणि माहिती तपासा

गुगल मॅप्सवरील ठिकाणे कधी कधी बंद किंवा चुकीची असू शकतात, त्यामुळे रेस्टॉरंट, दुकान किंवा हॉस्पिटलची रेटिंग्स-रिव्ह्यू आधी तपासावीत.

तुमची लोकेशन शेअर करा

प्रवास करताना आपल्या कुटुंबीयांसोबत तुमची सध्याची जागा शेअर करणे सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. गुगल मॅप्समध्ये 'लोकेशन शेअरिंग' फीचरचा वापर करून तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना तुमचे लाईव्ह लोकेशन दाखवू शकता.

NEXT: पावसाचा थेंब जमिनीवर पोहोचायला किती वेळ लागतो? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

येथे क्लिक करा