Dhanshri Shintre
यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर आगमन केले असून, मे महिन्यातच अनेक भागांत जोरदार सरींचा अनुभव आला आहे.
पावसाचा थेंब जमिनीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो आणि तो नेमका किती वेगाने खाली पडतो, माहिती आहे?
पावसाचे थेंब साधारणपणे ताशी 14 किमी या सरासरी वेगाने हवेतून जमिनीकडे पडत असतात.
मोठ्या पावसाच्या थेंबांना हवेतून जमिनीवर पोहोचण्यासाठी सुमारे दोन मिनिटांचा कालावधी लागतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
लहान पावसाचे थेंब हवेतून जमिनीवर पोहोचण्यासाठी साधारणतः सात मिनिटांचा कालावधी लागतो, असा अभ्यासातून निष्कर्ष निघाला आहे.
मोठे पावसाचे थेंब सुमारे 20 किमी/तास वेगाने पडतात, त्यामुळे काही मिनिटांतच रस्त्यावर पाणी साचू शकते.
मेघालयातील मावसिनराम हे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असून, येथे वर्षाला सरासरी 11,871 मिमी पाऊस पडतो.