ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
27 डिसेंबर 1998 रोजी नोएडामध्ये जन्मलेल्या या जुळ्या बहिणी त्यांच्या हुबेहूब दिसण्यामुळे लोकांना त्यांना ओळखणं कठीण जायचं आणि हाच त्यांचा खास गुण बनला.
सुरभि आणि समृद्धीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती.
चिंकी-मिंकीने त्यांच्या प्रवासाची सुरुवात टिकटॉक या अॅपवर व्हिडीओ बनवून केली.
सोशल मीडियावर त्यांनी ब्रँड प्रमोशन्स आणि यूट्यूब व्लॉग्समधूनही कोटींची कमाई केली. त्यांचे इन्स्टाग्रामवर करोडो फॉलोअर्स आहेत, यूट्यूबवरही लाखो सबस्क्राइबर्स मिळवले आहेत.
जून 2019 मध्ये त्या पहिल्यांदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये झळकल्या.
3 जुलै 2025 रोजी त्या दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या व्यावसायिक वेगळेपणाची घोषणा केली आहे.
चाहत्यांनी या बातमीवर निराशा व्यक्त केली आहे. अनेक चाहते त्यांच्या जोडीला मिस करतील, असे सोशल मीडियावर म्हणत आहेत.
दोघीही आता आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करतील. अजून तरी, त्यांनी त्यांच्या पुढील योजनांची माहिती दिलेली नाही.